मुलाच्या डोक्यात टाकला कोयता हल्लेखोर बाप पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव। मुलाच्याच डोक्यात ऊस तोडण्याचा कायता टाकून मुलाला जखमी अवस्थेत सोडून बाप फरार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली होती. मात्र, फरार झालेला बाप अनिल पुना जाधव (रा.रामदेववाडी, जळगाव) याला पनवेल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना मंगळवारी दुपारी एक वाजता सुशील मगरे या पोलीस कर्मचार्‍याने अर्धा किलोमीटर पाठलाग करुन पकडले. यावेळी जाधव याची मगरे यांच्याशी बराच वेळ झटापट झाली. परंतू झटापत होवून देखील पोलिस कर्मचार्‍यांने संशशिताला पकडून ठेवले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली.

मुलाच्याच डोक्यात टाकला कोयता अन् घरातून काढला पळ
दारु मुळे लग्न जुळण्यात अडचणी येत असल्याचे सांगणार्‍या विशाल जाधव (वय 23 रा.रामदेववाडी) या मुलाच्या डोक्यात अनिल याने रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता ऊस तोडण्याचा कोयता टाकला होता. डोक्यात दोन घाव घातल्याने विशाल हा रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच बेशुध्द पडला. वाद सोडविण्यासाठी आलेल्या आईलाही त्याने मारहाण केली होती. दारुच्या नशेत भयंकर कृत्य झाल्याचे पाहून अनिल याने तेथून पळ काढला होता. त्याच्याविरुध्द सोमवारी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण परिसरातून पकडले
अनिल जाधव हा दोन दिवसापासून जळगाव येथील मेहरुण तलाव परिसरातच वावरत होता. मंगळवारी तो पनवेल येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती म्हसावद दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुशील मगरे यांना मिळाली होती. त्यानुसार मगरे यांनी मेहरुण तलाव परिसरात त्याचा शोध घेतला असता तो निर्जन ठिकाणी आढळला. मगरे यांना पाहताच त्याने कृष्णा लॉनच्या दिशेने पळ काढला. मगरे यांनी त्याचा पाठलाग केला व लॉनच्या पुढे त्याला पकडले. यावेळी त्याने निसटून जाण्यासाठी मगरे यांच्याशी झटापट केली, त्यात मगरे यांना खरचटले आहे. झटापट होवून देखील मगरे यांनी त्याला पकडून ठेवत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले.