मुलाने मारला वडिलांच्या डोक्यात मोबाईल

0
चिखली : घरगुती किरकोळ कारणांवरून चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात मोबाईल फोन फेकून मारला. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना छत्रपती शिवाजी पार्क, चिंचवड येथे घडली. दिगंबर शंकर राळे (वय 52, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मुलगा सुरज दिगंबर राळे (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिगंबर यांचे मागील काही दिवसांपासून घरातील किरकोळ कारणावरून त्यांचा मुलगा सुरज याच्यासोबत भांडण होत होते. रविवारी (दि. 9) रात्री नऊच्या सुमारास त्यांचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी आरोपीने वडिलांना शिवीगाळ करत पलंगावर ठेवलेला मोबाईल फोन फेकून मारला. यामध्ये दिगंबर जखमी झाले. तसेच आरोपीने दिगंबर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून घाबरलेल्या वडिलांनी सोमवारी (दि. 17) रात्री चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस हवालदार सुभाष पिंगळे तपास करीत आहेत.