सूरत । दिवसागनीक मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना एक चांगले कार्य घडल्याचे आढळून आले आहे. गुजरातमधील एका व्यावसायिकाने पाटीदार समाजाच्या 10 हजार मुलींसाठी 200 कोटींचा बॉण्ड दिला आहे. मंगळवारी पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात लवजी डी. दैल्या उर्फ बादशाह यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानातून प्रेरणा मिळाल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. ते व्यावसायाने बिल्डर आहेत.
शिक्षण आणि लग्नासाठी बाँड
‘आमच्या समाजात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांशी बोललो असता लक्षात आले की, लोकांमध्ये बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याची इच्छा आहे. यासाठी माझ्या कुटुंबाने दुसर्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी हा बॉण्ड देण्याचा निर्णय घेतला’. या बॉण्डनुसार मुलीला तिच्या 20 व्या वाढदिवशी दोन लाख रुपये मिळतील. 2015-16 या वर्षात जन्मलेल्या आणि कुटुंबातील दुसर्या मुलींनाही ‘बादशाह सुकन्या बॉण्ड’ योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार आहे.
डी. दैल्या उर्फ बादशाह, बांधकाम व्यावसायीक
याआधिही असे उपक्रम राबले
10 हजार मुलींना 200 कोटींच्या हिशेबाने प्रत्येकी दोन लाख रुपये मिळाले आहेत. पाटीदार समाजातील पदाधिकार्यांच्या हस्ते या बॉण्डचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे बॉण्ड वितरण होण्याची हा काही पहिलीच वेळ नसून याआधीही असा कार्यक्रम झाला आहे. गतवर्षी सूरत, अहमदाबाद, आणि सूरतमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात 10 हजार मुलींना अशाप्रकारचा बॉण्ड दिला गेला होता. यावर्षीदेखील राजकोट आणि अहमदाबादमध्ये 8 मे आणि राजकोटमध्ये 15 मे रोजी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.