पुणे : अॅन्टी करप्शनच्या पथकाने काही दिवसांपूर्वी 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच घेताना एका वकिलाला अटक करून ताब्यात घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी अॅन्टी करप्शनच्या पथकाने मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना एका जमिन प्रकरणात 1 कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. इतक्या मोठ्या रक्कमेची लाच घेताना ’मुळशी‘च्या तहसिलदारांनी आपला ‘पॅटर्न‘च वेगळा असल्याचे दाखवून दिले आहे. या वर्षाची ही सर्वात मोठी दुसरी कारवाई असून अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून या वर्षातली 200 वी कारवाई केली आहे.
हे देखील वाचा
लवासा रोडला घेतले ताब्यात..
सचिन डोंगरे यांना लवासा रोडला 1 कोटची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. जमिनीच्या एका प्रकरणातून तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत पथकाने पंचासमक्ष याची पडताळणी केली. शनिवारी डोंगरेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सचिन डोंगरे याला देण्यात आलेल्या लाचेच्या रक्कमेत 15 लाख रुपयांच्या खर्या नोटा तर उर्वरीत डीमी नोटांची बॅग देण्यात आली होती. ही रक्कम स्विकारताना डोंगरे सापडला. या कारवाईमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.