डासांचा उपद्रव झाला कमी
सांगवी : सांगवी परिसरातील असलेल्या मुळा व पवना नद्यांमध्ये वाढणार्या जलपर्णी व डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून सांगवीकरांना हे कायमचे दुखणे झाले आहे. यावर्षीही हा त्रास खूप सहन करावा लागला आहे. महापालिकेकडून अनास्था दाखवित यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पवना नदीतील दशक्रियाविधी घाट ते सांगवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतची जलपर्णी दोनदा काढण्यात आली. यामुळे नागरिकांना त्रास कमी झाला आहे.
महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता.
उकाडा आणि डास
मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. नदी किनारा भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाबरोबरच जलपर्णीमुळे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत होता.
डासांचा त्रास कमी
त्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते आदींनी याकडे लक्ष दिले आहे. यामध्ये गावातील नागरिक, महिला, बच्चे कंपनी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यासाठी सर्वांनी आपले काम समजून या अभियानात सहभागी झाले होते. आता या परिसरातील नागरिकांना हायसे वाटू लागले आहे. डासांचा त्रास कमी झाला आहे.