मुस्लिम दफनभूमीसाठी 10 लाखांचा पहिला हप्ता

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील हरताळा येथे मुस्लिम कब्रस्तान दफन विधीसाठी अनेक वर्षांपासून जागा नव्हती. जागा मिळावी यासाठी गावातील भाजपा कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील लोकांना माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे ही समस्या मांडली होती व जागा मिळावी ही मागणी केली होती. त्यानुसार स्वतः आमदार एकनाथराव खडसे यांनी शासन स्तरावर मंत्रालयात पाठपुरावा केल्याने शासनाकडून 26 लाख रुपये जागा खरेदी करण्यासाठी व सुविधा करण्यासाठी मंजूर करण्यात आले असून 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने 81आर पैकी 23आर जागा वगळण्यात आली आहे.

मुस्लीम समाजाच्या अडचणी दूर होणार
हरताळा येथील मुस्लिम समाजाला दफन विधीसाठी समाजाची स्वतंत्र जागा नव्हती. एका खाजगी शेतात दफनविधी करावा लागत असल्याने असंख्य अडचणी येत होत्या. त्या समस्यांचा पाढा गावकर्‍यांनी आमदार खडसे यांच्याकडे वाचला. त्यानुसार आमदार खडसे, खासदार रक्षा खडसे, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी पाठपुरावा करुन जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेंतर्गत 26 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता गटविकास अधिकारी बैरागी यांना प्राप्त झाला व 8 रोजी 81 आरपैकी 23 आर जागा खरेदी करण्यात आली.

दफन विधीसाठी मिळाली स्वमालकीची जागा
ही जागा हरताळा येथील रहिवासी शेख शबानाबी शेख रहेमान व शेख रहेमान शेख उस्मान यांनी आपली स्वतःची जागा मुस्लिम कब्रस्तानला खरेदी करुन दिली. अशा या पवित्र रमजान महिन्याच्या काळात हरताळा येथील मुस्लिम समाजाला दफन विधीसाठी स्वमालकीची जागा मिळाल्याने समाधानाचे वातावरणिअसून समाजात आनंद साजरा करण्यात आला. ही जागा मिळावी यासाठी आमदार खडसे यांच्याकडे स्विय्य सहाय्यक योगेश कोलते, माजी सभापती राजू माळी, हरताळा सरपंच समाधान कार्डे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव भड, जयेश कार्डे, आनंदा कोळी, सिताराम चौरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शब्बीर खान, अब्दुल्ला शेठ, मेहबूब शेठ, गजानन काळे, दिलावर खान, फरीद सैय्यद, जऊर शेख, मौसिम खान, रईस, शेख शब्बीर, मिजवान यांनी प्रयत्न केले.