मुस्लिम मणियार एज्युकेशनल वेलफेअर सोसायटीची सभा

0

भुसावळ। मुस्लिम मनियार एज्युकेशनल वेलफेअर सोसायटीची सभा नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षस्थानी हाजी रसुल जनाब होते. कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरआन करुन अब्दुल रहिम यांनी केेली. हाजी अमानुलहक, अब्दुल रहमान, शेख अय्युब, सैय्यद सत्तार, सैय्यद जाफर, हाजी रसुल, शेख जाकिर, शेख शरिफ अमिर, अब्दुल रहिम यांचा सत्कार करण्यात आला.

मुस्लिम मनियार एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष मो. इद्रिस अमानुल हक यांनी कामकाजाची माहिती दिली. सोसायटीने 2015-16 व 2016-17 मध्ये विधवा महिलांना 98 हजार रुपये जमा करुन जकात वाटप केले तसेच पाच विधवा महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले. 45 महिलांना शिवण क्लास सुरु करुन तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले व प्रमाणपत्र वाटप केले. उपाध्यक्ष शेख यासिन यांनी पाच विधवा महिलांना गॅस सिलेंडर वाटप केले. यावेळी 29 ऑक्टोबर रोजी मुस्लिम मनियार बिरादरीच्या सामुहिक विवाह सोहळा घेण्याचे तसेच गरजूंना 10 हजार रुपये विनाव्याज कर्ज देण्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी शेख मोहसिन, शेख अमिन, शेख मेहबूब, शेख अय्युब, शेख जाकिर यांनी सहकार्य केले.