मुस्लीमांनी पुरोगामी विचारांची कास धरावी

0

समाजसेवा संघांचे अध्यक्ष सलिम शिकलगार यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : ‘मुस्लीम धर्मियांनी विकासाच्या प्रवाहात सामिल होण्यासाठी पुरोगामी विचारांची कास धरावी. मागील आठवड्यात देवबंद संस्थेने मुस्लीम नागरिकांनी विमा उतरविणे गैर असल्याचा फतवा काढला होता. मात्र, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सर्व नागरिकांना आरोग्य विषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ऐनवेळी उद्भवलेले आजारपण, अपघात यामुळे कुटुंबापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहते. यासाठी सर्वच नागरिकांनी जीवन आरोग्य विमा उतरवणे आवश्यक आहे’, असे मत पुणे जिल्हा शिकलगार समाज सेवा संघाचे अध्यक्ष सलिम शिकलगार यांनी व्यक्त केले.

गट विमा योजना
रविवारी निगडी येथील लायन्स क्लबच्या सभागृहात पुणे जिल्हा शिकलगार समाज संघ व आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व गट विमा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जीएसटी सहायक आयुक्त आर. आर. केडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब निगडी अध्यक्ष हरिदास नायर, सलिम शिकलगार, संस्थेचे सल्लागार दाऊद शिकलगार, हाजराबी शिकलगार, नजमा नझिर शिकलगार, रजनी पवार, शक्बाल युसुफ शिकलगार, कार्याध्यक्ष नजीर शिकलगार, सचिव अजिज शिकलगार, सहसचिव आसिफ शिकलगार, उपाध्यक्षा हलिमा शिकलगार, खजिनदार जमीर शिकलगार, जाकीर शिकलगार, जहांगिर शिकलगार, सदस्य इक्बाल शिकलगार, मिनाझ शिकलगार व शिकलगार समाजाचे पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते. 150 नागरिकांनी शिबिराचा व गट विमा योजनेचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरात मधुमेह, रक्तदाब, दंत चिकीत्सा करण्यात आल्या.