मुस्लीमांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा – शमसुद्दीन तांबोळी

0

मुंबई – कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मस्जिद मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा उपदेश करीत आहेत. भारतातही काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतांनाही काही मुस्लीम अडमूठेपणा करीत मस्जिद, टेरेसवर सामुदायिक नमाज पठण करीत असल्याचे लक्षात आले आहे. सब कुछ अल्लाह के मर्जीसे होगा, वह बचाने वाला है वगैरे वक्तव्य करुन दुआ करायला सांगत आहेत. हे वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लीम बांधवांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहीजे, मंदिर ,चर्च, बंद आहे , मस्जिद बंद ठेवली पाहीजे. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढतांना सर्वांसोबत मुस्लीम बांधवांनी सजग राहून सहकार्य करावे असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत असल्याचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.