जळगाव । के.सी.ई.सोसायटी संचलित मू.जे.महाविद्यालयात ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर फॅार व्हिजुअली चॅलेंज्ड केंद्र व एनेबल इंडिया बंगलोर यांच्या संयुक्त विद्यामाने 15 मे ते 2 जून 2018 पंधरा दिवस या कालावधित आयोजित बेसिक एमएस ऑफिस व अॅन्ड्राइड अॅक्सेसिब्लिटी कार्यशाळेचा समारोप पी.पी.माहुलीकर, प्रो.व्हाईस चान्सलर व डॉ.ए.पी.सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे डॉ.पी.पी.माहुलीकर यांचे स्वागत डॉ.ए.पी.सरोदे उपप्राचार्य वाणिज्यशाखा यांच्या हस्ते, विनायक एनबल इंडिया प्रशिक्षक बंगलोर याचे स्वागत व्ही.एस.कंची अॅडमिनिस्स्ट्रेटिव्ह कोऑर्डिनेटर ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेन्जड यांचे हस्ते झाले.
21 दिव्यांगांचा सहभाग
यावेळी महाराष्ट्रातील विविध गावातून 9 विद्यार्थिनी व 12 विद्यार्थी असे एकूण 21 दिव्यांगांनी आपला सहभाग नोंदवला. दी कार्यशाळा विना शुल्क होती. विद्यार्थ्याच्या राहण्याची, जेवणाची सोय मू.जे.महाविद्यालयतर्फे तसेच जळगावातील मान्यवर धनुभाई जैन व रतनलाल सी.बाफना यांनी दोन दिवस या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा खर्च पेलला. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचे अनुभव कथन केले. डॉ.पी.पी माहुलीकर, डॉ.ए.पी.सरोदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले.
यांनी घेतले परिश्रम
हया कार्यशाळेत संगणक हाताळणी, अॅन्ड्राइड डिव्हाइस हाताळणे, बेसिक टाईपिंग, एमएस वर्ड फाईल बनवणे, इंडरनेटच्या माध्यमातून सर्चिंग करणे,इ.न्यूज पेपर वाचणे. यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण व सराव श्री.विनायक एनेबल इंडिया व श्री श्याम मिश्रा अॅकेडमिक कोऑर्डिनेटर ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेन्जड यांनी विद्यार्थ्यांकडून करुन घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता वराडे यांनी केले आभार श्री.श्याम मिश्रा यांनी मानले तसेच या कार्यक्रमासाठी श्री.राठोड व श्रीजोशी यांनी परिश्रम घेतले.