जळगाव – मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेन्ट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे एम.ए. व्दितीय वर्षाच्या विद्यार्थीनींनी 1 ते 7 ऑक्टोबर 2018 या कालावधीत योग प्रकल्प घेतला. त्या मध्यमातून 30 ते 50 वयोगटातील महिलांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. आठवड्यातील सातही दिवस सहभाग नोंदवला असून शेवटच्या दिवशी शिबीराचा समारोप करण्यात आले. शिबीरात सहभागी झालेले महिलांनी आलेले अनुभव कथन केले.
महिलांनी कथन केले अनुभव
बऱ्याच महिलांनी योगाभ्यास करून कामांमध्ये उत्साह वाटला. चिडचिड कमी झाली, त्यांच्या मनातील असलेली भिती कमी झाली, तसेच योगा फक्त आठवड्यापुरता न ठेवता घरी देखील यापुढे असने करणार असल्याचे सांगितले. शिबीर यशस्वितेसाठी वैशाली मेंडकी, हर्षदा भिरूड, पूनम वाघ, हर्षदा जावळे व पुनम पाटील यांनी परीश्रम घेत महिलांना योगाचे अनमोल मार्गदर्शन केले.