प्रसारमाध्यमांच्या मा़र्फत अनेक मराठा समाजाचे मोर्चे बघितले मात्र मुंबई महानगरित धड़कलेला मराठ्यांचा भव्य मोर्चा प्रत्यक्षात अनुभवन्यास मिळाला . मोर्चा मोठा असणार म्हणून जय महाराष्ट्रला रिपोर्टिंग करण्यास आझाद मैदानात दाखल झालो . आझाद मैदानात दाखल होण्या आधीच या मोर्च्याचे स्वरुप लक्षात येत होते, ते म्हणजे महामार्गावर असलेली ट्रॅफिक जामनंतर डहाणूपासूनच तरुणांनी भरलेले रेल्वेचे डब्बे बघून आझाद मैदानात दाखल झालो त्यावेळी मराठा मोर्चा जवळपास जेजे फ्लायओवर जवळ पोहोचला होता. मात्र मोर्चात लाखो मराठा असतानादेखील इकडे आझाद मैदान पूर्ण मराठ्यांनी भरलेल पहायला मिळत होत. तरुण तरुणी प्रमाणे अनेक वृद्ध ही त्याच जोशाने या मोर्च्यात सहभागी झालेली . प्रत्येकाच्या चेहर्यावर एक काही तरी मिळवन्याची जिद्द होती तशीच मोठ्या प्रमाणावर आपला समाज एकवटल्याचा अभिमान ही . मराठा समाजाच्या इतर मोर्चाप्रमाणे हा मोर्चा मूक असला तरी मोर्चेकर्यांच्या बाइट घेताना त्यांची जिद्द आणि त्यांचा आक्रोश स्पष्ठ झळकत होता .
लाखो मराठा आपल्या कुटुंबासह ऊन- पाऊस आणि मुंबईतील ट्रॅफिक याचा विचार न करता आझाद मैदानात दाखल झाले होते. तसे यापूर्वी आझाद मैदानाने अनेक मोर्चे बघितले मात्र असा मोर्चा न भूतो न भविष्य . इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकवटला असताना ही उत्तम नियोजनामुळे या मोर्च्याच पोलिसांसह सामान्य मुंबईकरांना कोणताही त्रास झाला नाही . मराठा समाजातील तरुण आणि तरुणी सह प्रत्येकजण कोणतीही पैशाची अपेक्षा न करता सर्व नियोजन पहात होते . मोर्चेकरांना लागणार पिण्याच्या पाण्यापासून ते लागणार्या औषधापर्यंत सर्व घेऊन तरुण तरुणी ठिकठिकाणी आपल्या समाज बांधवांना मदत करण्यास तत्पर होते .. इतक्या मोठ्या जनसमुदायाला लागणार पाणी, औषध , नाश्ता यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल , प्लास्टिक पिशव्यानी आझाद मैदान ’ कचरामय ’ होणार हे अनेकांच्या मनात होत मात्र अस असताना देखील या कचर्याचही उत्तम नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते .. इतका मोठा जनसमुदाय असताना ही कोणताही गैरप्रकार या मोर्च्या दरम्यान पहायला मिळाला नाही . यात गाजर मिळाले ते सर्वच राजकीय पक्षांना . मोर्च्यात जाऊन श्रेय लाटण्याचा अनेक राजकीय पक्षांनी प्रयत्न केला मात्र या मोर्च्याने राजकीय पक्षांना गाजर दाखवला असे म्हटल तरी ते फारस काही वावग ठरणार नाही.
– राहुल आत्माराम पाटील,
पालघर प्रतिनिधि, जय महाराष्ट्र न्यूज़ चॅनल,