मूकबधिराने बनवले भंगारापासून विमान!

0

बधिर माणसाने टाकाऊ वस्तूंपासून चक्क विमान बनवले आहे. त्याला लहानपणापासूनच अशा वस्तूंपासून नव्या वस्तू बनवण्याची आवड होती. गावातील अनेक लोक त्याला मूर्खात काढत असत. मात्र, आता त्याने बनवलेले दोन सीटचे हे विमान पाहून लोक थक्क होत आहेत. थॉमस जन्मापासूनच मुका आणि बहिरा आहे.

आता 45 वर्षांचा असलेला थॉमस आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करुन जीवनात पुढे जात आहे. त्याने स्वत:च अशा अतिशय हलक्या वजनाच्या विमानाचे डिझाईन तयार केले आणि त्याची निर्मितीही केली. डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘एचआरएक्स सुपरहिरोज्’ या कार्यक्रमात तो सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचा अँकर हृतिक रोशन आहे. थॉमसने तयार केलेल्या विमानाचे नाव ‘साजी एक्स एअर-एस’ असे आहे. तिरुवनंतरपूरमच्या फ्लाईंग ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीत या विमानाच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.