मृत्यनंतर दोन वर्षांनी तो तरुण झाला जुळ्या मुलांचा पिता!

0

पुणे । पुण्यामध्ये एका 27 वर्षीय तरूणाच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर त्याच्या वीर्यापासून जुळ्या मुला-मुलीचा जन्म झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांनी मुलाचे वीर्य जर्मनीतील मेडिकल सेंटरमध्ये गोठवून ठेवले होते. त्या वीर्यापासून दोन बाळांचा जन्म झाला आहे. दोन वर्षाआधी या तरूणाचे ब्रेन ट्यूमरने निधन झाले होते. डॉक्टरांनी मुलाचे वीर्य व एका महिला डोनरच्या अंडाणुंचे मिलन करून भ्रुण तयार केले. यानंतर डॉक्टरांनी भ्रुणाचे सरोगेट आईच्या गर्भात प्रत्यारोपण केले.

कठीण प्रक्रियेलाही तो सामोरा गेला
माझा मुलगा नेहमी सगळ्यांशी मिळूनमिसळून राहायचा. केमोच्या कठीण प्रक्रियेलाही तो सामोरा गेला. त्याचदरम्यान त्याचे डोळे गेले. पण तरिही त्याचे आयुष्यावरील प्रेम कमी झाले नाही. आजारी असूनही तो तरूण सगळ्यांना कहाण्या व गंमतीशीर किस्से सांगून खूश करायचा. मुलाच्या स्वभावासारखीच नातवंडे मिळावी, असा विचार तेव्हा मुलाच्या आईच्या मनात आला.

कॅन्सरमुळे 2016मध्ये झाला होता मृत्यू
भ्रुण प्रत्यारोपण केलेली महिला मृत्यू झालेल्या तरूणाची नातेवाईक आहे. या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 2013मध्ये जर्मनीत शिक्षण घेत असताना पुण्यातील 27 वर्षीय तरूणाला ब्रेन ट्यूमर असल्याचे निष्पन्न झाले. केमो थेरपीमुळे मुलाची प्रजनन क्षमता कमी होईल, अशी शक्यता त्यावेळी डॉक्टरांनी वर्तविली होती. म्हणून केमो थेरपी सुरू करण्याच्या आधी डॉक्टरांनी तरूणाचे वीर्य सुरक्षित ठेवले. त्यानंतर 2016मध्ये मुलाचा मृत्यू झाला.