मृत ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई- पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी येथील ऊसतोड मजूर प्रदिप कुटे याच्या कुटूंबियास १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

पोलिसांनी ऊसतोड मजुराला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.