नवी दिल्ली । वर्ल्ड कपनंतर आता मिनी वर्ल्ड कपमध्ये भारत पाक क्रिकेटचे युध्द होणार आहे.या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामन्यापुर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलने आपल्या व्यक्तव्याने मोठी खळबळ उडवून दिली आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारणारा पाकिस्तान संघ अचानक संशयाच्या भोवर्यात अडकला आहे. ’पाकच्या विजयामागे बाहेरचे कुणीतरी आहे’असे व्यक्तव्य सोहेलने केले आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या उपांत्य फेरीची लढत इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झाला.ज्या इंग्लंडच्या खेळाडूनी या ट्रॉफीत सातत्याने चांगली कामगिरी केली.मात्र पाकिस्तान विरूध्द सामन्यात त्यांना पाककडून पराभव पत्कारावा लागला.तो ही उपात्य सामन्यात पराभव झाल्याने त्यांची फायनलमध्ये जाण्याची संधी हुकली.आता पाकिस्तानची टक्कर बलाढ्य भारतीय संघासोबत होणार आहे.चॅम्पियन ट्रॉफीची फायनल होण्यापुर्वीच पाक संघ व त्याचा कर्णधारवर ’ मॅच फिक्सिंग’च्या फेर्यात सापडला आहे.
पाकच्या खेळावर शंका
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमिर सोहेल यानं तसा संशय व्यक्त केला आहे. तू काहीही कमाल केली नाहीस. ’कर्णधार सरफराजला कुणीतरी सांगायला हवे की, तू काही महान काम केलेले नाहीस. पडद्याच्या मागे काय झाले हे आम्हाला माहीत आहे. कुणी भलत्यानेच तुम्हाला जिंकण्यासाठी मदत केलीय. त्यामुळे फार खुश व्हायचे कारण नाही. या संघाला इथवर आणण्यात आलेय’, असा गौप्यस्फोट आमीर सोहेलने केला आहे. अर्थात या सगळ्याचा सूत्रधार कोण, हे मात्र त्याने जाहीर केलेले नाही. ’कुणामुळे पाकिस्तान इथपर्यंत आलेय, हे मला विचारू नका. विचारलेत तर मी इतकेच सांगेन की, चाहत्यांच्या प्रार्थना आणि ईश्वराच्या कृपेनेच ते इथे आहेत’, असे त्याने म्हटलेय .असे म्हणून सोहेलने पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळावरच शंका उपस्थित केली आहे.
चूक दाखविणे आमचे काम
तुमचे डोके ठिकाणावर ठेवा. डोक्यावर बसण्याची गरज नाही. तुमची पात्रता काय आहे, हे आम्हाला माहित आहे. तोंड बंद ठेवून तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही काही चुकीचे करत असाल तर ती चूक दाखवून देणे हे आमचे काम आहे. तुम्ही चांगले कराल तर त्याचे कौतुकही आम्ही करू. तुम्ही चांगला खेळ करत आहात आणि तुमच्याकडून काही चूक होत असेल तर त्यावर आम्ही फार काही बोलणार नाही. तुमचे डोकं ठिकाणावर राहू द्या, असे सोहेलनं सरफराजसह पाकिस्तानी संघातील खेळाडूंना सुनावले आहे. सेमी फायनलआधीचे होते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सोहेलने केला आहे.