पुणे: मध्य रेल्वेच्या आकुर्डी, चिंचवड स्टेशनदरम्यान रेल्वेलाईनच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी ९ जून रोजी भुसावळहून पुण्याकडे जाणारी ११०२५, तसेच पुण्याहून भुसावळकडे येणारी ११०२६ हुतात्मा एक्स्प्रेस ही मनमाड, दौंड मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.
हा मेगाब्लॉक सकाळी ७ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच पुणे, शिवाजी नगर येथून सुटणाऱ्या तळेगाव, लोणावळा, पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पॅसेजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.