मेगा भरतीला कोणतीही अडचण नाही; लवकरच भरती सुरु होईल-मुख्यमंत्री

0

धुळे- राज्य सरकारने ७२ हजार पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. आज धुळे दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीबाबत लवकरच निर्णय होईल. न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जागा निघतील, आता कोणतीही अडचण नाही, असे स्पष्ट केले.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणी धनगर समाजाच्या संघटनांच्या वतीने करण्यता आली होती. तर, या मेगाभरतीला विरोध करत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानेही काही तात्काळ भरतीप्रक्रिय सुरु करण्यास आक्षेप नोंदवला होता.

राज्य सराकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांमध्ये सर्वाधिक ११ हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्यानंतर, आरोग्य खात्यात १० हजार ५६८ जागा भरण्यात येतील, तर तिसऱ्या क्रमांकावर सार्वजनिक बांधकाम विभागात जागा भरण्यात येतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते.