मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दीपिका पादुकोण

0

मुंबई: बॉलीवूडची मस्तानी म्हणजेचं दीपिका पादुकोणने ‘पद्मावत’ चित्रपटानंतर कोणताच चित्रपट साईन केला नाही. आता दीपिकाच्या हाती एक चित्रपट लागला असल्याचे सांगितले जात आहे. दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, दीपिका आणि मेघना यांच्यात आगामी प्रोजेक्टसंदर्भात चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कोणता आहे आणि त्यामध्ये इतर कोणकोणते कलाकार काम करणार आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.