मुंबई : मराठी बिग बॉसची विजेती मेघा धाडे हिंदी भाषेतील बिग बॉसच्या १२ व्या पर्वात झळकणार आहे. बिग बॉस हाऊसमध्ये मेघाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे समजते.
मेघ धडे बिग बॉसचा पूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरली होती. तिने कधी प्रेमाने तर कधी तिखट बोलण्याने पण खेळ उत्तमरीत्या खेळत स्वत:च स्थान टिकवून ठेवले. रोखठोक बोलण्याने ती नेहेमीच चर्चेत राहिली. आता हिंदी बिग बॉसच्या १२ व्या पर्वात तिला संधी मिळत आहे.