मेट्रोपोलीटन संघाच्या सदस्यांना मिळाली ओळखपत्रे

0
पोलीस उपनिरीक्षक झेंडे यांच्या हस्ते केले वाटप
चिंचवड : लींक रोड येथील मेट्रोपोलीटन सोसायटीतील जेष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना नुकतीच ओळखपत्रे वाटप करण्यात आले. या संघाच्या सदस्यांना पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या हस्ते 45 जेष्ठांना पुणे पोलीस सिनीअर सिटीझन ओखळपत्रांचे वाटप करण्यात आले. लोकांना वाटण्यात आले. त्यावेळेस पोलीस नाईक संतोष फावडे, सहाय्यक पोलीस फोसदार दत्तात्रय कांबळे उपस्थित होते. तसेच अशोक लुंकड व वेणुगोपाल नायर यांच्या वाढदिवस सर्व जेष्ठांच्यावतीने साजरा करण्यात आला. तसेच यावर्षी नवरात्र उत्सवाचे पिंपरी-चिंचवड या सर्व भागामध्ये 5 स्मृतीचिन्ह व जेष्ठ नागरिक यांच्यावतीने पुष्पगुच्छ, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देउन मोहन खांडकर यांना गोरविण्यात आले.
ओळखपत्र उपयोग करून घ्यावा
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना या ओळखपत्राचा खूप उपयोग होत असतो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचा उपयोग करण्यासाठीही उपयोग होतो. तसेच कोणी ज्येष्ठ नागरिकांना दुखापत झाल्यास, या ओळखपत्राद्वारे त्यांना घरी पोहोचविणे सोपे जाते. त्यामुळे सर्वांनी हे ओळपत्र जवळ नेहमी बाळगावे. यावेळी संघाचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी सचिव शरद लुणावत, बबन बुरडे, मधुकर वागदरीकर, व्हिक्टर डिसुझा, डॉ. गुरव, सुभाष गरड, शंकर सत्यगिरी, नरहरी भागवत, प्रकाश जेन,आनंद आफळे, रविंद्र शेट्टे, संभाजी वाळके, डॉ. प्रताप कोठारी, अशोक नहार, प्रकाश कदम, रवी राठोड, भावसार, प्रकाश खटावकर, कांतीलाल भंडारी, मिलींद मुळे, जयंत श्रेत्रमाडे, भाऊसाहेब पाटील, अशोक कर्नावट, आदी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्तविक अनंत कुलकर्णी व सुत्रसंचालक खुशाल दुसाने व आभार शरद लुणावत यांनी मानले.