मेट्रोला पाहिजेत संत तुकारामनगर, फुगेवाडी, नाशिक फाटा येथे जागा

0

पिंपरी-चिंचवड : शहरात दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यान पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महापालिकेच्या ताब्यातील मुख्यलयाच्या प्रवेशद्वारजवळील, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाणपुल, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, मोरवाडी चौकातील आणि फुगेवाडी जकात नाका या जागांची प्रामुख्याने पुणे महामेट्रोला आवश्यकता आहे. जागा हस्तांतरणासंदर्भात मंगळवारी महापालिकेत बैठक झाली. आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश कदम, पालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, भुमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे उपस्थित होते.

दापोडी ते पिंपरी मार्गावर दहा जागा
शहरात दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यान पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महामेट्रोला यासाठी पालिकेच्या जागेची आवश्यकता आहे. दहा ठिकाणच्या जागेची मागणी पुणे महामेट्रोने पालिकेकडे केली आहे. पिंपरी महापालिका प्रवेशद्वाराजवळील, भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाणपुल आणि फुगेवाडी जकात नाका येथील जागेची महामेट्रोने पालिकेकडे मागणी केली आहे. अशा दहा ठिकाणाच्या जागा महामेट्रोला लागणार आहेत. या जागा महामेट्रोला देण्याची मागणी मेट्रोच्या अधिका-यांनी पालिकेकडे केली आहे.

…यानंतरच होईल निर्णय
याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पुणे महामेट्रोने पालिकेच्या ताब्यातील दहा ठिकाणच्या जागा मागितल्या आहेत. महामेट्रोला कोणती जागा आणि किती जागा पाहिजे, याबाबत चर्चा झाली. कोणती जागा द्यायची हे निश्‍चित झाल्यावर महासभेसमोर प्रस्ताव आणला जाईल. महासभेची मान्यता घेऊन महामेट्रोला जागा दिली जाणार आहे.