मेट्रोसाठी केंद्राकडून 1300 कोटी

0

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून 1300 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारणी करण्यात येत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) त्याची अंमलबजावणी करण्यास अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या मेट्रो मार्गाची लांबी 23.3 किलोमीटर राहणार असून, या प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी रूपये आहे. केंद्राकडून मिळणार्‍या 1300 कोटी रूपयांच्या निधीमुळे आता या प्रकल्पाला आणखी गती मिळणार असून, पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या या मोलाच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले आहेत.