‘मेड इन चायना’मध्ये राजकुमार रावसोबत झळकणार मौनी रॉय

0

मुंबई: बॉलिवूडचा व्हर्साटाईल अभिनेता राजकुमार राव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘स्त्री’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर१०० कोटींचा गल्ला जमविला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटाकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे.

राजकुमार लवकरच ‘मेड इन चायना’ या चित्रपटात झळकणार आहे आणि या चित्रपटातून पुन्हा एकदा टीव्हीची नागीण मौनी रॉय मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. राजकुमाराने या चित्रपटाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम आकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीच्या पदरात आणखी एक चित्रपट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मौनीचे चाहते पुन्हा एकदा तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे.