मेन रोडवर मोठा खड्डामुळे अपघातास निमंत्रण

0

शहादा – तालुक्यातील वैजाली गावात मेन रोडवर मधोमध मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा अडथडा ठरत आहे. तरी ग्रामपंचायतीने ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थाकडून होत आहे. वैजाली हे गाव पंचकृषीतील मधोमध असलेले गाव असून या गावातील या रस्यावरून परीसरातील बोरद, कलमाडी, सोनवल, करणखेडा, वाडी, पुनरवसण, खरवड, मोड आदि गावातील वाहणांची रात्री पहाटे रोज वर्दंड सुरू असते. मात्र हा मेन रोडवरील खड्डा वाहनधारकांना अडथडा ठरत आहे. रात्रीच्या वेडेस या खड्यामुडे मोठा अपघात होण्याचे नाकारता येऊ शकत नाही. मग याला जबाबदार कोण ग्रामपंचायत की, ठेकेदार असाही प्रश्न उपस्थीत होत आहे. तरी संबधीत विभागाणे ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे.