जळगाव। गीत झंकार निर्मित मेलडी सुपर हिटस् ऑकेस्ट्रातर्फे दि. 13 ऑगस्ट रोजी महान गायक स्व. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायिलेल्या निवडक गीतांचा महफिल -ए-किशोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम रोटरी भवन मायादेवी नगर येथे सायं. 6.30 ते 9.30 वा.पर्यंत होणार आहे. राजू जंगालेसह लक्ष्मण नाटेकर, कपिल घुगे, संगीता सामुद्रे, शरद भालेराव, प्रा. यशवंत सैदाणे, डॉ. राजेश पाटील गाणी सादर करणार असून राजू ढाके मालेगाव, युवराज सोनवणे, दिपक तायडे, दिपक नाटेकर, सुरेश साळुंखे, संगीत साथ करणार आहे. निवेदन शाम जगताप तर दिग्दर्शन मोहन तायडे करणार आहे. तरी रसिकांनी उपस्थिती द्यावी, कार्यक्रम विनामूल्य आहे.
26 रोजी ‘जळगाव फेस्टीव्हल’
गीत झंकार निर्मित मेलडी सुपर हिटस् ऑर्केस्ट्राच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 ऑगस्ट शनिवारी रोजी सकाळी 11 ते 6 पयर्ंत सरदार वल्लभभाई पटेल सभागृह जळगाव येथे जळगाव फेस्टीव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात सोलो डान्स (13 वर्षाआतील), सोलो डान्स (14 वर्षावरील) स्पर्धा तसेच समुह नृत्य व गीत गायन स्पर्धा खुल्या घेण्यात येणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना गोल्डन ट्रॉफी बक्षिस देण्यात येणार आहे. बक्षिस वितरण संध्याकाळी 6.30 वाजता होणार असून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, महापौर नितीन लढ्ढा व माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. नाव नोंदणीसाठी जोशी स्पोर्टस् नवीपेठ, जळगाव, मोहन तायडे विसनजी नगर, जळगाव 9860303888 यांचेशी संपर्क साधावा. कार्यक्रम विनामूूल्य असून रसिकांनी उपस्थिती द्यावी,