मेळसांगवे येथे दोन गटात हाणामारी

0
मुक्ताईनगर: – तालुक्यातील मेळसांगवे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत 5 जण जखमी झाले असून दोन्ही गटातील  15 आरोपींविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी जितेंद्र गजमल पाटील रा. मेळसांगवे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आरोपी युवराज शंकर बेलदार व देवराज युवराज बेलदार यांनी फिर्यादीच्या भाऊस व गावचे सरपंच युवराज देवदास पाटील यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या भावाने पोलिस स्टेशनला यापूर्वी दिलेल्या फिर्यादीचा राग आल्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत राजेंद्र लक्ष्मण पाटील, किरण गजमल पाटील व जितेंद्र गजमल पाटील हे तिघे जखमी झाले आहेत. आरोपींनी किरणला रस्त्यात अडवून सुरवातीला मारले व त्या सोडवण्यास गेलेल्या जितेंद्र व राजेंद्र यांना देखील कुर्‍हाडीने मारहाण केली. तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.  तर दुसर्‍या घटनेत फिर्यादी युवराज शंकर बेलदार यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी किरण गजमल पाटील, गजमल लखन पाटील, संजय त्र्यंबक पाटील, राजेंद्र लक्ष्मण पाटील, युवराज देवीदास पाटील, जितेंद्र गजमल पाटील, योगेश अंबादास पाटील, मोहन अंबादास पाटील, बबलू युवराज पाटील, आंबादास तोताराम पाटील, त्र्यंबक तोताराम पाटील, दिलीप काशिनाथ पाटील व मनोज काशीनाथ पाटील या 13 आरोपींनी  24 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मागील कारणाच्या भांडणावरून युवराज शंकर बेलदार व देवराज युवराज  बेलदार यांना मारहाण केली. तसेच किरणने तु आमच्या केसमधून  जामीनावर सुटला असला आहे परंतु तू गाव सोडून दे नाहीतर तुला ठार करू अशा आशयाचे धमकी देत गैर कायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे. तपास पोहेकॉ अनिल अडकमोल करत आहेत.