नगरसेविका सोनी बारसेंसह संतोष बारसेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
भुसावळ- भुसावळात विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना नगरसेविका सोनी संतोष बारसे व संतोष बारसे यांनी समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले. वाल्मीक मेहतर समाज हा उपेक्षित घटक असून समाजाच्या प्रतिनिधीला सत्तेत सहभागी करून घ्यावे तसेच स्वच्छतेशी निगडीत समाज दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत असल्याने या समाजाच्या पाल्यांना आरटीई कायद्याच्या माध्यमातून दहा टक्के सरळ प्रवेश देवून शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे बारसे कुटुंबियांनी केली. प्रसंगी आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, राजू खरारे आदींची उपस्थिती होती.