शेंदुर्णी । येथील गरूड महाविद्यालयात आज दुपारी 2 वाजता महाविद्यालयातील 10वी व 12वीच्या विध्यार्थ्यांना समारंभ पूर्वक निरोप देण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी जि. प. सदस्य सागरमल जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयजी गरुड यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थांनी मेहनत, आचरण आणि संस्कार यातुनच व्यकतीचा खर्या अर्थाने विकास होतो त्याचे पालन करण्याचा सल्ला दिला. तर आ.र.भा.गरुड महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील यांनी आपल्या मार्मिक भाषणातून जग विज्ञानात कितीही प्रगत झाले, तरी ठरावीक कोर्स व पदवी घेऊन पॅकेजवर काम करुन आधुनिक जगातील सालदार की युवकानीं अंगीकारल्याने माणुसकी हरवत आहे. म्हणुन आधी माणुस म्हणून जगायला शिका, कष्ट मेहनतीतील सातत्य व ध्येय यातून जो उज्वल भविष्याचे स्वप्न पाहा, असा सल्ला देऊन छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत स्वतःच्या आयुष्याचे ध्येयाचे योग्य नियोजन सर्वप्रथम करावे, असे मौलीक विचार मांडले. यावेळी उपस्थिता मध्ये पं.स. सदस्य शांताराम गुजर, माजी सदस्य सुधाकर बारी उपस्थित होते. मुख्याध्यापक बी. जी. माडवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेत आहे.