जळगाव – सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी बुधवारी दुपारी 3 वाजता मेहरूण तलाव येथे एक होमगार्ड पाण्यात बुडत असताना जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्यास वाचवले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गणपती विसर्जनावेळी ही घटना घडली. बुधवारी मेहरुण तलवात सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. दुपारी 3 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थापना झालेली गणेश मूर्ती कर्मचार्यांनी विसर्जनासाठी आणली होती. यावेळी पोलिस कर्मचार्यांसोबत ड्युटीवर असलेले होमगार्ड देखील आले होते. गणपती मूर्ती विसर्जीत करताना एका होमगार्डचा पाय घसरल्याने तो पाण्यात बूडत होता. यावेळी जीवरक्षक दलातील सुर्यभान अभंगे, महेश माचरे, भरत बारी, रवी सपकाळे यांच्यासह महापालकेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचार्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. दहा जणांनी मिळुन होमगार्डला सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे काही वेळ गणपती विसर्जन थांबवण्यात आले होते.