मैत्रेय कंपनीमधील गुंतवणुकदारांची रक्कम मिळवून द्यावी

0

पिडीत ग्राहक व प्रतिनिधीचे आमदारांना साकडे

चाळीसगाव । मैत्रेय कंपनी मधील गुंतवणुक दारांची रक्कम मिळवून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा करुन मार्ग काढावा असे मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोशियनच्या वतीने चाळीसगाव येथील मैत्रेय कंपनी चे ग्राहक व प्रतिनिधी यांनी आमदार उन्मेश पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. मुख्यमंत्री यांना निवेदन देवून त्यांची भेट देखील घेतली व मुख्यमंत्र्यांनी मिटींग लावण्याचे आश्‍वासन देखील दिले आहे. तरी आपण हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा घडवुन गुंतवणुक दारांची रक्कम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विश्‍वास पवार यांच्यासह प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.

मतदार संघात हजारो लोकांना पैसे अडकले
आमदार उन्मेश पाटील यांना मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोशियनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील व सचिव निलेश वाणी यांच्या सहीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की मैत्रेय उद्योग परिवार हा राज्यातील नामकिंत परिवार होता 1998 पासुन महाराष्ट्रासह 6 राज्यात कंपनी काम करीत होती. मात्र 2016 ला कंपनीच्या संचालिका सत्पाळकर यांना सरवाडा नाशिक पोलीसांनी ताब्यात घेऊन सोबत कंपनीचे मुख्य सर्व्हेर, डाटा ताब्यात घेतला तेव्हापासुन कंपनीचे कार्यालय बंद आहेत व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कंपनीवर गुन्हे दाखल आहेत. यात अनेकचा पैसा अडकला असुन मुलींच्या लग्नासाठी ठेवलेला पैसा परत मिळत नसल्याने लग्ने पुढे ढकलली जात आहेत कंपनीच्या संचालीका महिला असल्याने 70 टक्के या महिला प्रतिनिधी आहेत, आपल्या मतदार संघात हजारो लोकांचे पैसे यात अडकले असुन त्यामुळे ग्रहाक महिला प्रतिनिधीना खालच्या दर्जाचे भाषा वापरतो त्यामुळे महिलाना समाजात वावरणे घरात राहणे मुश्‍लीक होऊन काही प्रतिनिधीना माहेरी पाठविले गेले असुन काहीनी आत्महत्तेचा प्रयत्न केला आहे. या अगोदर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी व ग्राहकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मोर्च काढली उपोषणे केली गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचे पोलीसांना आदेश ही दिले गेले.