मैदानावर आक्रमकता ही दिल्लीची संस्कृतीच:गंभीर

0

नवी दिल्ली । खेळाच्या मैदानावर खेळाडूंची आक्रमकता ही अनेकांना विचार करायला भाग पाडते. आयपीएलमध्ये असे अनेक आक्रमक खेळाडू आहेत. यामध्ये विराट कोहली, गौतम गंभीर सारख्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. दिल्लीचे खेळाडू मैदानावर इतक्या शिव्या का देतात? असा प्रश्न गंभीरला विचारल्यावर गंभीरने यावर उत्तर देताना ’ही गोष्ट ते कोणाकडून शिकत नाहीत, पण दिल्लीची संस्कृतीच अशी आहे’ असे सांगितले आहे.

एका मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला की, मला आणि विराटला बघून तुम्हाला असेच वाटेल असे सांगताना मैदानावर आक्रमक राहण्यासाठी शिव्या देतो असे गंभीर म्हणाला. गंभीरने पुढे बोलताना सांगितलं की, ’ही गोष्ट ते कोणाकडून शिकत नाहीत, पण दिल्लीचे कल्चरच असे आहे. हे ’गुण’ दिल्लीच्या खेळाडूंमध्ये आपोआप येतात, तुम्ही याला दिल्लीची संस्कृती म्हणू शकता, पण या आक्रमकतेचा फायदा मैदानावर आणि खेळासाठी होतो’, असे तो म्हणाला. मी भांडण करून घरी जातो तेव्हा घरच्यांचा सामना करायला लाज वाटते’, असेही गंभीरने मान्य केले.