मैदानी खेळातून आदर्श व्यक्तीमत्त्व घडते

0

नंदुरबार । विविध मैदानी खेळातून आदर्श व्यक्तीमत्त्व घडते, म्हणून स्पर्धांमधून मैदाने गजबजलीच पाहीजेत, असे प्रतिपादन आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. राज्य शुटींगबॉल असोसिएशनच्या मान्यतेने एस.ए.मिशन ट्रस्ट व नंदुरबार जिल्हा हौशी शुटींगबॉल असोसिएशनच्यावतीने स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ 31 वी राज्य शुटींगबॉल सबज्युनिअर-ज्युनिअर मुले-मुली निवड चाचणी स्पर्धेला येथील एस.ए.मिशन क्रीडांगणावर सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व बलून सोडून करण्यात आली.

21 जिल्ह्यातील 36 स्पर्धकांचा सहभाग
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.ए.मिशनचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन आर.के.वळवी, व्हा.चेअरमन संतोष देशपांडे, एस.ए.मिशनच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, उपप्राचार्य डॉ.मधुकमल हिवाळे, संचालक पी.डी.लवणे, जे.एच.पठारे, राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे सचिव के.आर.ठाकरे, उपाध्यक्ष सी.आर.आरडे, तांत्रिक समिती चेअरमन अशोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारीया, जि.प.सदस्य विक्रमसिंग वळवी, शत्रुघ्न बालाणी, क्रीडा शिक्षक मिनल वळवी, क्रीडा कार्यकर्ते प्रा.मयुर ठाकरे आदींच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेला राज्यभरातून 21 जिल्ह्यातील 36 मुला-मुलींच्या संघांचा सहभाग आहे. स्पर्धा यशस्वीसाठी सतिष सदाराव, अनिल रौंदळे, जितेंद्र पगारे, शरद घुगे, जगदिश वंजारी, भरत चौधरी, योगेश माळी, सौरभ कानोसे, ममता फटकाळ, दिपाली जोहरी, राकेश माळी, भरत कुंभार, विजय जगताप, नरेश राठोड, जयेश राजपूत आदी परिश्रम घेत आहेत. पंच म्हणून अशोक तायडे, नईम शेख (जळगांव), रामलाल पवार (औरंगाबाद), दिलीप गायकवाड (नाशिक), चंद्रकांत नगरे (ठाणे) आदी काम पहात आहेत.