जळगाव । संभाव्य भरतीचा विचार करुन दर्जी फाउंडेशनतर्फे एकदिवशीय नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. लेखी चाचणीबरोबरच मैदानी चाचणी प्रक्रियेचेही संपूर्ण मार्गदर्शन यात करण्यात आले. पोलीस दलात कशा पध्दतीने कार्य करावे लागते. तसेच या क्षेत्रात वेळेप्रसंगी कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते याबाबत गोपाल दर्जी यांनी भरतीपूर्व विद्यार्थी मेळाव्यात माहिती दिली.
अभ्यासाची सर्वंकष दृष्टी ठेवा
एखादा खेळांचे प्रमाणपत्र असेल तर पुढील मार्ग काही अंशी सोपा होतो. म्हणूनच शिक्षण घेतांना खेळांनाही प्राधान्य द्यायला हवे. असे असले तरीही मार्गदर्शकाचे दिलेले ज्ञान आणि आपण सर्वकष दृष्टीने केलेला अभ्यास आपल्याला यशस्वी करत असतो, महाराष्ट्र पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया, मैदानी चाचणीतील प्रक्रियेमध्ये झालेला बदल, वेळेचे नियोजन, अभ्यासक याबाबत दर्जी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रामकृष्ण करंके व आभार उमेश पाटील यांनी मानले.