मॉडर्नच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0

15 विद्यार्थी आले गुणवत्ता यादीत

निगडी-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने जाहीर क रण्यात आलेल्या इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निगडी येथील मॉडर्न हायस्कुल व कनिष्ठ महा विद्यालयामधील 15 विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त केले आहे. यामध्ये इयत्ता 5 वी तील 9 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-सावंत प्रसाद-254, आगलावे एकनाथ-244, केदार सुहानी-230, दळवी प्रतीक-226, कुलकर्णी पुष्कराज-222, सोनवणे योगीशा-218, मेरतकर श्रेया-214, खडसे श्रुती-214, निकम यशश्री- 212 गुण प्राप्त झाले. तसेच इयत्ता 8 वीतील चौधरी भूषण-226, लांडगे चेतन-224, तावरे वैष्णवी-212, सूर्यवंशी जयेश-210, भोगील सार्थक-200, वाघ यश-198 सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इ.5 वी आणि इ. 8 वी चे मिळून एकूण 15 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण निकम, रामचंद्र घाडगे, अमोल नवलपुरे, मीना अधिकारी, साधना राऊत, मनीषा बोत्रे, आशा कुंजीर, सुजाता ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव क रण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य सतीश गवळी, पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.