पोलीस तपासासाठी शाळेला दिली सुटी
रावेर– शहरातील रावेर महामार्गावरील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धुडगूस घालत कागदपत्रांची नासधूस केली. नेमके काय चोरीला गेले याबाबत अधिकृत माहिती कळू शकली नाही. पोलिसांना तपासासाठी गैरसोय होवू नये यासाठी शाळा प्रशासनाने शुक्रवारी शाळेला सुटीजिाहीर केली. चोरट्यांनी शाळेतील कपाटातील महत्त्वाच्या कागदपत्रांची नासधूस केयाचे सांगण्यात आले. या घटनेत कुठलीही रक्कम चोरीला गेली नसलीतरी शाळेत चोरट्यांनी प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. अधिक तपास रावेर पोलिसांकडून केला जात आहे.