नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात महिला आणि शोषित वर्गाला स्थान नसून त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. मोदींसाठी मेहुल चोक्सी, नीरव मोदी, अनिल अंबानी, ललित मोदी हीच लोक ‘भाई’ आहेत. ते शेतकरी आणि कामगार वर्गाला कधीच ‘भाई’ म्हणत नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी सोमवार पासून मध्य प्रदेशमधील दौऱ्याला सुरुवात केली. पहिल्याच सभेत त्यांनी मोदींवर निशाना साधला. शोषित व महिलांसाठी पंतप्रधानांच्या ह्रदयात स्थान नाही. त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. जी लोकं सुटाबुटामध्ये असतात त्यांनाच मोदी ‘भाई’ म्हणतात. मेहुल भाई, नीरव भाई, अनिल भाई, ललित भाई हे त्यातलेच आहेत. ते कधीच शेतकरी आणि कामगारांचा उल्लेख ‘भाई’ म्हणून करत नाही. ते गरिबांना ‘भाई’ म्हटल्याचे कधी ऐकले का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे कर्ज मार्फ करावे, असे आवाहन मी स्वत: नरेंद्र मोदींना केले होते. पण नरेंद्र मोदींनी त्याबाबत मौन बाळगले, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.