मोकाट कुत्र्यांचा आठ जणांना चावा

0

जळगाव । शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल आठ जणांना चावा घेवून जखमी केले. जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा चावा घेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. यात कुत्र्यांनी बालकांसह वयोवृद्धांना चावा घेवून त्यांचे लचके तोडून जखमी केले आहे. यामध्ये पियुष सतिष बढे (वय-7,रा. जुने जळगाव), रोहन अमोल तायडे (वय-6,रा. शेवगाव), वंदना सुहास बेंडाळे (वय-31,रा. जुने जळगाव), भटेसिंग दर्शन पाटील (वय-19,रा. रामानंद नगर), किशोर लक्ष्मण वसाने (वय-53 ,रा.किसनरावनगर), निलीमा बाळू राखपसरे (वय-23,रा. हरिविठ्ठलनगर), शुभम लक्ष्मण हतांगळे (वय-17 ,रा. हरिविठ्ठलनगर), उमेश शहेजाद खान (वय-19 ,रा.शनिपेठ) हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.