मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

0

मोशी : मोशी, चिखली, डुडूळगाव या भागात कुत्र्यांचा उपद्रव अधिक आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढतच असून ती रोखण्यात महापालिकेला अपयश आले आहे. अगोदरच वाहतूक समस्येचा सामना करावा लागणार्‍या वाहनचालकांना या मार्गावर येणार्‍या कुत्र्यांचा जीव वाचविण्याची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.