जळगाव । शहरात रात्रीच्या वेळेस दुचाकी वाहन चालवितांना आता कुत्र्याच्या कळपाने हैराणक केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे असून ते रात्रीला दोन चार कुत्र्यांचे टोळके तयार होवून बेधकपणे रस्त्यावर मुक्त संचार करतात. मात्र्र कोणतेही कारण नसतांना हे मोकाट कुत्रे, अचानक केलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरून, वाहक चालक आपल्या गाडीला वेग वाढवतो या भितीपोटी तो वाहन चालक तोलजावून पडण्याच्या घटनेत शहरात वाढ होत आहे. चौका चौकात अशी मोकाट कुत्रे शहरात मोठ्या प्रमाणात दिसतात. तरी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देवून तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.
अंगावर धावून येतात….
दिवसभर मोकाट फिरून हे टोळके आपल्या नेहमीच्या चौकात कळप तयार करतात. एक दोन नव्हे तर तब्बल 10 ते 12 कुत्र्यांचे टोळके हे रस्त्यावर मस्ती करीत असतात. यांच्या जवळून एखादे दुचाकी वाहन गेले तर त्यातील एक कुत्रा अचानक या वाहनावर धाव घेतो. व त्या कुत्र्यामागृ दहा कुत्रे टोळके असते. मस्तीत असलेल्या या कुत्र्याने अचानक केलेल्या धाव्यामुळे किंवा हल्ल्यामुळे वाहन चालक अतिशय घाबरून जाती व तोंडातून आवाज काढत आपले वाहन वेगात काढत पळविण्याचा प्रयत्न करतो. यात त्याचातोल जावून तो खखमीही होतो ही आपबिती अनेकांनी बोलून दाखवती.
पालकांमध्ये भिती
रस्त्यावरून महिला व बालकांना रहदारी करतांना काळजी घ्यावी लागते. परिसरातील कुत्रे सावजाच्या शोधात सतत फिरत असतात. अशावेळी एकट्या दुकट्या बालकावर हल्ला करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत.
त्यामुळे पालक मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडतांना खबरदारी घेत असतात. परंतू जरअशा कुत्र्यावर प्रशासनाने त्वरीत आवर घातला नाही तर एखादी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही. अशी भिती नागरिकांनी सतत वाटत असते.