मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी

0

नवापूर। शहरात मोकाट गुरे ढोरे सोडून नागरिकांना याचा त्रास होण्याचा प्रकारामध्ये वाढ झालेली दिसून येत. गुरेढोरे रहदारी व मुख्य बाजार रस्त्यांमध्ये उभे राहिल्यामुळे वाहतुकीस व रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहतुक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहे. तसेच लहान मोठे अपघातांमध्ये वाढ झालेली दिसून येते.

आगामी काळात येणार्‍या गणेशोत्सव, नवरात्र, इत्यादी सण उत्सवासाठी बाजारात गर्दी होत असते अशा वेळेस मोकाट गुरेढोरे नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनात अचानक घुसून अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तरी मोकाट सोडलेल्या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे बंदिस्त करावी असे आवाहन मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.