जनशक्ती बातमीचा इम्पॅक्ट
चाळीसगाव – नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत सर्वसाधारण सभा संपन्न झाली यात शिवसृष्टी व शिवस्मारक संदर्भात शहर विकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तर विषय क्रमांक ८ यात शहरात मोकाट फिरणारी जनावरे व डुकरांपासून होणारे वाहन चालकास अडथळे व अपघात या प्रश्नांना नगरसेवक शेखर देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच मोकाट जनावरांच्या बाबतीत निविदेत डुकरांचा समावेश करण्यात यावा असे त्यांनी सांगितले तर या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच विषय क्र. ६० नुसार घाट रोड येथील उर्दु कन्या शाळा बाबत छाया बुंदेलखंडी यांच्या अर्जावर विचार करण्यात आला. नगरपालिका उर्दु कन्या शाळा या जागेच्या स्थलांतरावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला. यात नगरसेवक शेखर देशमुख यांनी नगरपालिका उर्दु शाळा ही नगरपालिका मंगल कार्यालय (२६/२) या जागेवर स्थलांतर करण्यात येवू नये म्हणून स्पष्ट विरोध दर्शविला. त्या जागेवर शादीखाना मंजूर असून त्यावर ५० लाख रूपये मंजूर सुध्दा झालेले आहे. त्यामुळे इतर कुठल्याही कारणासाठी ती जागा हस्तांतरीत करण्यात येवू नये अशी मागणी नगरसेवक शेखर देशमुख यांनी केली.
Next Post