एरंडोल । शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गटागटाने फिरणारे कुत्रे नागरिकांवर चालून येत असल्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरासह नवीन वसाहतींमध्ये कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.परगावाहून वाहनातून पकडून आणलेले भटके कुत्रे शहराच्या वेशीजवळ सोडण्यात येतात. त्यामुळे नवीन वासाहैन्मध्ये कुत्र्यांचा वावर वाढला आहे. प्रत्येक वसाहतीत मोकाट कुत्रे गटागटाने राहून वाहनांच्या मागे लागत असतात.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पायी जाणार्या नागरिकांच्या अंगावर देखील धावून जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व लहान बालकांना कुत्र्यांचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मोकाट कुत्र्यांना विविध आजारांची लागण झालेली आहे. गुरांच्या तसेच बकर्यांच्या मागे कुत्रे लागत असल्यामुळे सैराट झालेले गुरे पळत असल्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वार चालक वाहन घसरून पडून जखमी झाले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी परगावाहून येणार्या नागरिकांना अत्यंत भीतीयुक्त वातावरणात घरी जावे लागते. तसेच अनेक भागात मोकाट कुत्रे रात्रभर भुंकत असल्यामुळे लहान बालकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष घालून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलांनी केली आहे.