मोझे विद्यालयात रंगला अक्षरोत्सव!

0

येरवडा । महापालिकेच्या कै. हंबीरराव कृष्णनाथ मोझे प्राथमिक विद्यालय व झेन्सार सीएसआर, आरपीजी फाउंडेशन यांच्या वतीने दि. 8 ते 11 जानेवारी या कालावधीत शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षरोत्सव ‘अ फेस्टिवल ऑफ थॉट्स’ हा कार्यक्रम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व विविध उपक्रमातून मुलांमधील वाचन कौशल्य वाढण्यासाठी घेण्यात आला. प्रत्येक वर्गासाठी दीड तासांचा कालावधी देण्यात आला. या वेळेत अर्धा तास वैयक्तिक वाचन, अर्धा तास विविध उपक्रम व खेळ व अर्धा तास विविध शाळेतील मुख्याध्यापक व झेन्सारमधील स्वयंसेवक यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली व गोष्टी सांगितल्या. सुवर्णा डोईफोडे यांनी गायलेल्या पसायदानाने सांगता झाली. सोमनाथ उचाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वैशाली घोडके यांनी
आभार मानले.

शाळेच्या प्रांगणात उत्सवाचा समारोप
यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा सांगता समारोह 12 जानेवारीला शाळेच्या प्रांगणात झाला. नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमन पठारे, एम. आर. जाधव, रणजित पंडित, महेश कुलकर्णी, शारदा सिंग, मुख्यध्यापक लता नरके, शामला कुटाळ, रफिक अली बेग, कुंदा पाचारणे, अरुणा सुतार यावेळी उपस्थित होते.