मोटर वायडींगचे दुकान खाक

0

चिखली : कुदळवाडी चिखली येथे एका मोटर वायडींगच्या दुकानाला शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आरिया मोटर वायडींग असे दुकानाचे नाव आहे.

पिंपरी अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र पाल व अनिल कुमार यांचे कुदळवाडी येथे हे दुकान आहे. वायडींगचे काम सुरु असताना सोल्डरींग करताना आग लागली. वर्दी मिळताच घटनास्थळी वल्लभनगर व तळवडे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. मात्र अगदी जवळ-जवळ दुकाने असल्याने आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली. तासाभराच्या प्यत्नानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र या आगीत दुकानातील सर्व मोटरवायडींचे सामान, कपाट, संगणक, इतर कागदपत्रे जळून खाक झाली.