मोटारसायकलच्या धडकेत दोन जण ठार

0

नवापुर। विसरवाडी – नंदुरबार रस्त्यावरील वळणावर भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकल यांच्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसरवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर वळण रस्त्यावर जोरदार धडक होऊन अपघात झाला. समोरासमोर जोरात धडक झाल्याने त्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरच्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

दोघांचा जागीच मृत्यू
नंदुरबार तालुक्यातील तलावपाडा येथिल मयत बाजीराव चामार्‍या गांगुर्डे (वय 50) व मयत राहुल कृष्णा गांगुर्डे (वय 13) हे बॉक्सर क्र.(एम.एच. 41-2551)ने विसरवाडी कडे येत असतांना समोरुन विसरवाडी हुन जात असलेल्या फॅशनप्रो क्र.(जी.जे.21 एफ 8809) वरील सिंगा भामट्या गावीत (वय 40), भोगड्या इरजी गावीत (वय 35), दिलीप सुकड्या गावीत (वय 35) सर्व राहणार खोकसा यांच्या दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडकेने दोन जण जागीच ठार झाले.

विसरवाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद
तर समोरच्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांना ग्रामीण रुग्णालयात विसरवाडी येथुन प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. या अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.