जळगाव – शहरातील हॉटेल निलांबरी थांब्याजवळ उभ्या असलेल्या महिलेस भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने महिला जखमी झाले असून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अलका रामदास लोहार (वय-44) रा. श्रीकृष्ण नगर, गोपाळपूरा, ह्या हॉटेल निलांबरी थांब्याजवळ एकांतात उभ्या असतांना समोरून भरधाव वेगाने दुचाकी क्रमांक (एमएच 30 1265) ने जोरदार धडक दिली. या धडकेत महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अलका लोहार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात दुचाकी क्रमांक (एमएच 30 1265) वरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजाराम पाटील करीत आहे.