मोटारसायकल घसरल्याने दोघे जखमी

0

जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल

जळगाव । वाळूच्या कामासाठी जाणार्‍या 35 वर्षीय व्यक्ती आपल्या नातेवाईकासह जळगाव येथे पगार घेण्यासाठी जळगावला आले. पगार घेवून घराकडे मोटारसायकलने परतत असतांना खेडी फाट्याजवळ मोटारसायकल घसरल्याने मोटारसायकल चालक व मागे बसलेला 19 वर्षी मुलगा जखमी झाले. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, संजय अशोक मोरे (वय-35) रा. खेडी आव्हाणे ता. जळगाव हे वाळूच्या ठेक्यावर कामासाठी जातात. जळगाव ते खेडी आव्हाणे येथून ते दररोज कामासाठी ये-जा करतात. आज त्यांना कामाचा पगार घेण्यासाठी जळगावला बोलविल्यानंतर ते सोबत आत्याचा मुलगा अविनाश फकिरा जाधव (वय-19) रा. खेडी आव्हाणे याला सोबत घेवून पगार घेण्यासाठी गेले.

तोल गेल्याने दुचाकी रोडावरून घसरली
जळगावला पगार घेतला आणि पुन्हा खेडी आव्हाणेकडे परतत होता. रविवार असल्याने रोडवर वाहतूक कमी असल्याने आपण मोटारसायलक चालविणे शिकून घेवू असे अविनाश जाधवने संजय मोरेला सांगितले. दरम्यान दुचाकी चालवत असतांना खेडी फाट्यावर आल्यानंतर गाडीवरील तोल गेल्याने दोघे जण जखमी झाले. या दोघांना उठविण्याच्या नादात मागून येणार्‍या मोटारसायकलस्वारने धाव घेतली त्यावेळी त्याचा देखील मोटारसायकलीत पाय अडकल्याने तो देखील खाली पडला. यात अपघातात संजय मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर अविनाश जाधव यांच्या हात व पायाला दुखापत झाली. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.