मोटारसायकल घसरुन वाहतुक पोलीसासह एक जखमी

0

बिलाखेड टोल नाक्याच्या पुढील घटना
चाळीसगाव – बेलगंगा साखर कारखान्यावर बंदोबस्तासाठी जात असलेल्या चाळीसगाव वाहतुक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल तालुक्यातील बिलाखेड टोल नाका पुढे मारुती मंदीर यांच्या मध्ये घसरुन पोलीस कर्मचाऱ्यासह एक जण जखमी झाल्याची घटना आज ७ डिसेंबर रोजी सकाळी ८-३० वाजेच्या सुमारास घडली असुन पोलीस कर्मचाऱ्यावर येथील देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.

आज दिनांक ७ रोजी बेलगंगा साखर कारखाना येथे गव्हाण पुजन व प्रथम उस गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम असल्याने त्या बंदोबस्तासाठी चाळीसगाव शहर वाहतुक शाखेचे पो कॉ राजेन्द्र अजबराव निकम (३३) हे त्यांच्या मोटारसायकल वर चालले असताना बिलाखेड गावाजवळील टोल नाका व मारुती मंदीराच्या दरम्यान रस्त्यावर मुंगुस व कुत्रा आडवा आल्याने त्यांची मोटारसायकल घसरुन त्यांच्यासह मागे बसलेले सुकलाल धर्मा पगारे जखमी झाले आहेत राजेंद्र निकम यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर येथील देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.