जळगाव। शहरातील डॉ. ए.जी.भंगाळे हॉस्पीटल समोरून चोरट्याने 11 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मोटारसायकल चोरून नेली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली असून त्याला गुरूवारी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मारूती पेठ येथील रहिवासी भुषण सुधाकर खैरनार (वय-24) याची 60 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटारसायकल ही 11 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. यानंतर भुषण खैरनार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी राजेंद्र उर्फ सोफराजा दत्तात्रय गुरव (वय-29 रा. संस्कार कॉलनी) याला अटक केली. त्याला 20 मे पर्यंत कोठडी दिली.